कठुआतील जंगलात दहशतवाद्यांचा शोध सुरुच   

सहा जणांची कसून चौकशी

कठुआ : जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील जंगलात लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम वेगाने राबवण्यात आली आहे. त्या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान आणि श्वान पथकांचा वापर केला जात आहे.गेल्या आठवड्यात गुरुवारपासून दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम राबविली आहे. चकमकीत दोन दहशतवादी आणि चार पोलिस कर्मचारी ठार झाले आहेत. चकमकीनंतर दहशतवादी जंगलात पळून गेले आहेत. त्यांचा शोध आता घेतला जात आहे. त्यांचा खात्मा केल्याशिवाय कारवाई मागे घेण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले. 
 
दरम्यान, दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून सहा जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या माध्यमातून जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी जंगल पिंजून काढण्यास सुरूवात झाली आहे.
 

Related Articles